रमेश पई यांच्याकडून कळसुलकर प्रशालेस एक लाखाची देणगी..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 23, 2023 16:10 PM
views 125  views

सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा कळसुलकर इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघाचे मार्गदर्शक रमेश विष्णू पई यांनी प्रशालेच्या विकासासह शैक्षणिक सोयी सुविधांसाठी एक लाख रुपयाची देणगी दिली. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै यांच्याकडे त्यांनी ही मदत सुपूर्द केली. 

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी या संस्थेसह व शाळेच्या जडणघडणीत रमेश पई यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी यापूर्वीही  वेळोवेळी शाळेच्या शैक्षणिक विकासात मदतीचा हात दिला आहे. यावेळी संस्थेतर्फे व प्रशालेतर्फे रमेश पई यांचे सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै यांनी आभार मानले.

यावेळी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे संचालक संचालक गौरांग चिटणीस,  प्राचार्य नारायण मानकर, शिक्षक श्री बागुल, वैभव केंकरे आदी उपस्थित होते.