कळसुलकर महाविद्यालयाची 12 वीच्या निकालात बाजी

Edited by: विनायक गांवस
Published on: May 02, 2026 15:53 PM
views 69  views

सावंतवाडी : १२ वी निकालात सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाने आपले यश कायम राखले आहे. कला आणि वाणिज्य दोन्ही शाखांमधील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रशालेतून वैष्णवी वैद्य हीने ७३.३३ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक प्राप्त केला.

प्रशालेतून द्वितीय क्रमांक चिन्मयी सदानंद जोशी ७१.३३% तर तृतीय क्रमांक गायत्री भिकाजी मेस्त्री ६९.१७ % हीने प्राप्त केला. कला शाखेचा निकाल ६५.५१% लागला असून एकूण ३० विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्रमांक कु. चिन्मयी सदानंद जोशी ७१.३३ % प्रथम, द्वितीय क्रमांक कु. गायत्री भिकाजी मेस्त्री ६९.१७ %, तृतीय क्रमांक कु. सर्वेश अशोक नाईक ५८.५० % यांनी प्राप्त केला. वाणिज्य शाखेचा निकाल ८०% लागला आहे. प्रथम क्रमांक कु. वैष्णवी गंगाराम वैद्य ७३.३३%, द्वितीय क्रमांक कु. निर्जरा दीपक कोलगावकर ६०.६७%, तृतीय क्रमांक कु. दुर्वा कृष्णा होडावडेकर ६०.००% प्राप्त केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या कष्टाचे हे फळ असून त्यांच्या भावी वाटचालीस मुख्याध्यापक श्री भुरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.