कळसुली दूध खरेदी केंद्र सुरू ; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कळसुलीत 200 लि. दुधाचे संकलन
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 15, 2022 15:03 PM
views 285  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील कळसुली गावात संतोष सुतार सुतारवाडी यांच्या निवासस्थानी प्रथमच दूध खरेदी केंद्र गावांतील शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांची वाढती संख्या लक्षात घेता हे दूध खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या दूध खरेदी केंद्राचे उद्घाटन कळसुली गावांतील ज्येष्ठ शेतकऱ्यांकडून गुरुवार १३ ऑक्टोबर ला करण्यात आले. यावेळी गावातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पहिल्या दिवशी ८५ लि. दुध संकलन झाले, तर दुसऱ्या दिवसापासून १०० लि. दुध संकलन झाले असून दिवसेंदिवस दुधात वाढ होेत आहे. कळसुली गावात गाई व म्हशीं दुभत्या जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. भविष्यात शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय लक्ष दिल्यास मोठा फायदा करून देणार हेच या दुध केंद्र सुरू करण्यामागचे उद्दिष्ट असल्याचे शेतकऱ्यांमधून सांगितलं जात आहे. 


सकाळी ७:३० ते ८: ०० वाजता तर संध्याकाळी ६:३० ते ७:०० ठिकाणी संतोष सुतार सुतारवाडी यांच्या घरी दूध खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.तरी गावांतील दूध उत्पादन शेतकऱ्यांनी नोंद घेवून कळसुली गावातील जनावरांची  वाढ करून उत्पादनात वाढ घडवुन आणावे.


यावेळी सामजिक कार्यकर्ते सुशांत दळवी, ग्रा.पं.सदस्य शिवकिर्ती सुतार, डॉ. एस एस दळवी, अक्षता देवळी, संतोष सुतार, भिकाजी मटकर, जे.जे.दळवी, दौलत सुतार, सिताराम सुद्रिक, राजेंद्र दळवी, अरविंद शिंदे, सोमा परब, राजेंद्र पारधी, मनोहर केसरकर, भानू घाडीगावकर, रुपेश कदम, नरेंद्र दळवी,मॅक्सी फर्नांडिस, रामचंद्र गुरव, प्रताप दळवी यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.