विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम व्हावे : के. आर. दळवी

कळसुली शिक्षण संघातर्फे गुणवंतांचा गौरव
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 28, 2025 12:37 PM
views 200  views

कणकवली : सध्याचे युग स्पर्धेचे आहे. या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वकष ज्ञान आत्मसात केले पाहिजे. संस्काराच्या शिदोरीने मनुष्य परिपूर्ण होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना संस्कारक्षम व्हावे, असे आवाहन शालेय समितीचे चेअरमन के.आर. दळवी यांनी केले.

कळसुली शिक्षण संघ, मुंबई संचलित कळसुली  इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आॅफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली  प्रशालेत दहावी- बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. यावेळी  शिक्षण संघाचे सल्लागार प्रकाश दळवी , स्कूल कमिटी व्हाईस चेअरमन नामदेव घाडीगावकर, समिती सदस्य रजनीकांत सावंत, शुभदा देसाई, मुख्याध्यापक  व्ही. व्ही .वगरे,पर्यवेक्षक श्री. सावळ, बापू खरात, डी.जी.तेली  शाळा व्यवस्थापन व शिक्षक पालक संघ समितीचे सदस्य शिवप्रसाद घाडीगावकर, राजाराम चव्हाण, यशवंत सावंत श्री. रामचंद्र सावंत,निता गुरव श्वेता दळवी, विनोद कदम, रणजीत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.        

आर्या तेली, पूर्वा घाडीगावकर, संघवी परब, शुभम कदम, विराज सुतार, कोमल सुतार, रतन सुतार, कुणाल वायंगणकर, पायल कदम  या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते कळसुली शिक्षण संघ, मुंबई यांच्यावतीने वह्या, फोल्डर व गुलाबपुष्प देऊन गुणगौरव करण्यात आला.

जयवंत कुलकर्णी ,बापू खरात, शिवाजी गुरव,निता गुरव,शुभदा देसाई, शिवप्रसाद घाडीगावकर यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.  प्रकाश दळवी यांनी मनोगत व्यक्त केले.  पुरुषोत्तम दळवी, सूर्यकांतदळवी, सरचिटणीस- मा. विजय सावंत, सर्व संस्था पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक व्ही.व्ही. वगरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभरप्रदर्शन आनंद सावंत  यांनी केले. यावेळी शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.