कलमठ ग्रा.पं. उपसरपंचपदी भाजपचे दिनेश गोठणकर

ठाकरे शिवसेनेचा पराभव
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 23, 2025 18:09 PM
views 200  views

कणकवली : कलमठ ग्रामपंचायतीच्या रिक्त उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच संदिप मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. सरपंच संदिप मेस्त्री, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी निवडणुकीचे काम पाहिले. यामध्ये भाजपचे दिनेश गोठणकर यांनी उबाठा गटाचे धीरज मेस्त्री यांचा १५ विरुद्ध २ मतांनी पराभव केला. स्वप्नील चिंदरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर कलमठचे उपसरपंच रिक्त झाले होते.

दिनेश गोठणकर हे वॉर्ड क्रमांक एक मधून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष केला. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदिप मेस्त्री, भाजपा शहर मंडल तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शक्तीकेंद्र प्रमुख स्वप्नील चिंदरकर,विजय चिंदरकर, महेश लाड, गुरू वर्देकर, ग्रामपंचायत सदस्य पपु यादव,अनुप वारंग,श्रेयस चिंदरकर,सचिन खोचरे,नितीन पवार,स्वाती नारकर ,सुप्रिया मेस्त्री, प्रीती मेस्त्री,नजराणा शेख,ईफत शेख,तनिष्का लोकरे,प्रियाली आचरेकर ,तेजस लोकरे, बूथ अध्यक्ष आबा कोरगावकर, परेश कांबळी, नाना गोठणकर, बाबू नारकर,संतोष रेवंडकर ,प्रवीण सावंत, शेखर पेंढरकर, महेश मेस्त्री, दिनार लाड, प्रथमेश धुमाळे, सागर पवार, जयराम चिंदरकर, बाळा चिंदरकर,संकेत वर्देकर, प्रवीण परब, परेश आचरेकर, आबी नांदगावकर, रामू वर्देकर,भाऊ चिंदरकर ,श्रेया वावळीये, नितेश चिंदरकर,समीर नांदगावकर,संदिप चिंदरकर, सागर चिंदरकर, श्रवण वावळीये आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.