कलमठ शिवसेना, युवासेना कार्यकर्त्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 18, 2023 20:30 PM
views 99  views

कणकवली : शाळेतील काही गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणक साहित्याची आवश्यकता असल्याचे कलमठ बाजारपेठ शाळेचे शिक्षक पवार सर यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना कळवले. याची तात्काळ दखल घेत विभाग प्रमुख  अनुप वारंग आणि युवासेना तालुका संघटक नितेश भोगले यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित विद्यार्थ्यांना वर्ष भरासाठी लागणारे शालेय साहित्य वेळीच उपलब्ध करून दिले. 80 टक्के समाज कारण आणि 20 टक्के राजकारण हे शिवसेनेचे ब्रीद जपल्याने या कामा बद्दल गावातून युवा सेनेचे कौतुक होत आहे.


या उपक्रमासाठी कलमठ गावातील सामाजिक कार्यकर्ते  विनायक (बाळू )मेस्त्री, युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड, विभाग प्रमुख अनुप वारंग, युवासेना कणकवली तालुका संघटक नितेश भोगले, ग्राम पंचायत सदस्य धीरज मेस्त्री, सचिन खोचरे, कलमठ माजी सरपंच निसार शेख, धनश्री मेस्त्री आदी शिवसेना युवासेना कार्यकर्ते तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल कोरगावकर मुख्याध्यापिका श्री.सावंत, श्री.पवार, डगरे, मांजरेकर, लोकरे सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.