शिवजयंती उत्सव समितीतर्फे कलमठ रक्तदान शिबिराचे आयोजन

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 18, 2024 13:52 PM
views 202  views

कणकवली : शिवजयंती उत्सव समिती तर्फे कलमठ येथे रविवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३५ रक्तदात्यानी रक्तदान केले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अमेय मडव, अरविंद गावडे, दिनेश लाड, विलास गुडेकर, निसार शेख, किरण हुन्नरे, सुनिल मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच रामदास विखाळे, रुपेश नार्वेकर, तनोज कळसूकर, कांबळे गुरूजी, बाळा चिंदरकर, कान्हा मालंडकर, सचिन खोचरे, शिवाजी मोहित, अर्चना कोरगांवकर, सुहासिन कुलकर्णी, धनश्री मेस्त्री, बाबू कोरगांवकर, सुंदर कोरगांवकर, चेतन कडूलकर, इम्तियाज फकीर मान्यवरांनी हजेरी लावली.

शिवजंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम करण्यात येतात. यंदाही शिवजयंती उत्सव समिती, कलमठ तर्फे चित्रकला, चित्र रंगभरण, वकृत्व स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे नियोजन सुशांत (बाबू) राऊळ नितीन (आबा) मेस्त्री, धिरज श्रीधर मेस्त्री, अनुप वारंग, सचिन पेडणेकर, नितेश भोगले, सिकंदर मेस्त्री, सागर गावडे, प्रदीप सावंत, नितिन पेडणेकर, नंदकिशोर कोरगांवकर, संदीप कांबळी, वैभव लाड  शिवजी महाराज उत्सव समिती कलमठ सदस्यांनी केले आहे.