मांगेलीत आत्मा अंतर्गत काजू मोहर संरक्षण प्रशिक्षण

मांगेली येथील शेतकरी केशव विष्णू गवस यांच्या काजू बागेवर पार पडलं प्रशिक्षण
Edited by: संदीप देसाई
Published on: December 30, 2022 19:49 PM
views 243  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका आत्मा कृषी विभाग अंतर्गत काजू मोहोर संरक्षण प्रशिक्षण देऊळवाडी मांगेली येथे नुकतेच संपन्न झाले.

मांगेली येथील शेतकरी केशव विष्णू गवस यांचे काजू बागेवर हे संरक्षण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी आत्मा कमिटीच्या सदस्य श्रेयाली सुभाष गवस, ग्रामपंचायत सदस्य सुनील राजाराम गवस यांसह नारायण महादेव गवस, महादेव हरिश्चंद्र गवस, देविदास सदाशिव सावंत, चंद्रशेखर सावंत, प्रमुख मार्गदर्शक, तालुका कृषी अधिकारी  प्रमोद बनकर, दोडामार्ग कृषी सहाय्यक उसप जी.आर. वाघमारे,  साईराम शिंदे,कृषी सहायक, भेडशी.व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी काजूचे मोहर संरक्षण, पी.एम किसान योजना, या विषयावर प्रमोद बनकर तालुका कृषी अधिकारी, दोडामार्ग यांनी उपस्थीत शेतकरी यांना मार्गदर्शन केले. चंद्रशेखर सावंत, यांनी काजुतील रोठा नियंत्रण याविषयी माहिती दिली. तदनंतर कुसगेवाडी येथे उपस्थित ग्रामस्थांच्या लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला यावेळी भिवा चंद्रकांत गवस, विजय देऊ गवस, नम्रता नारायण गवस,जानकी मनोहर गवस, अश्विनी भिवा गवस, अर्जुन तुकाराम गवस व इतर शेतकरी उपस्थित होते. सदर बंधारा हा रब्बी क्षेत्र वाढ मोहिम अंतर्गत कृषी विभाग व लोकसहभागातून बांधण्यात आला आहे .