कै. भाऊ साळगावकरांच्या आठवणींना उजाळा

Edited by: विनायक गावस
Published on: August 19, 2023 20:04 PM
views 81  views

सावंतवाडी : राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्यावतीने आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी कै. बाळ उर्फ भाऊ साळगावकर यांना आज श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. 

त्यावेळी उपस्थितांन पैकी सुरेश भोगटे, प्रदीप भालेकर, रघु लाखे ,यशवंत देसाई, सुधीर पराडकर, विलास जाधव, अण्णा केसरकर यांनी स्वर्गवासी भाऊं साळगावकरांबद्दलच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या.

या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाला अभय पंडित, दीपक सावंत, रतन माळी, प्रकाश मांजरेकर, महादेव राऊत, श्याम हळदणकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, उमेश खटावकर, सचिन इंगळे, उदय भराडी, तुषार राऊळ, बंड्या तोरस्कर, किरण वाडकर, सुभाष बीरोडकर, बंटी माठेकर, दिलीप पवार, संजय साळगावकर, मनोज राऊळ, राजा सांगेलकर, सोन्या कासार व रवी जाधव उपस्थित होते.