कै. जयानंद मठकर स्मृती पुरस्कार सतीश लळीत यांना प्रदान

नष्टकर्मी मानव स्वार्थासाठी पर्यावरण बदलतोय : सतीश लळीत
Edited by: विनायक गांवस
Published on: April 08, 2024 06:35 AM
views 167  views

सावंतवाडी : माजी आमदार, स्वातंत्र्य सैनिक, साप्ताहिक वैनतेयचे माजी संपादक व ज्येष्ठ समाजवादी नेते कै. जयानंद मठकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्ताने  'कै. जयानंद मठकर स्मृती पुरस्कार,' मुख्यमंत्र्यांचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांना  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कमलताई परुळेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन  प्रदान करण्यात आला. यावेळी पर्यावरण स्वतः कधीच बदलत नाही. मात्र, नष्टकर्मी  मानव आपल्या स्वार्थासाठी पर्यावरण बदलत आहे. गेली दहा वर्ष पर्यावरणाबाबत कोणती आस्था नसलेले सरकार केंद्रात आहे. प्रकाश जावडेकर यांच्यासारखा पहिला निष्क्रिय पर्यावरणमंत्री आपणाला लाभला. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. या सरकारने पर्यावरणाबाबत कायद्यात नको ते बदल केलेत. एनजीटी सारखी संस्था ही कागदी वाघ बनवली आहे. शक्तिपीठ महामार्ग ज्या पद्धतीने होत आहे ते पाहता भरमसाठ जंगल तोड होऊन आपल्या सह्याद्रीचा बट्ट्याबोळ होईल. यासाठी सर्वांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे व पर्यावरण वाचविण्यासाठी योग्य निर्णय जनतेने  घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे माजी मुख्य जनसंपर्क अधिकारी सतीश ललित यांनी केल सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित व्याख्यान मालेच्या समारोप प्रसंगी 'कोकणातील बदलते पर्यावरण आणि कातळशिल्पांचे जतन' या विषयावर श्री. लळीत यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रसाद गावडे उपस्थित होते.

सर्वप्रथम स्वर्गीय जयानंद मठकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमालताई परूळेकर, संस्थेचे अध्यक्ष प्रसाद बांदेकर, ॲड. संदीप निंबाळकर, ॲड. अरुण पणदूरकर, रमेश बोंद्रे, ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर, डॉ. सई लळीत, सौ. सीमा मठकर, मिहीर मठकर आधी उपस्थित होते. सतीश ललित पुढे म्हणाले, यापूर्वी स्वर्गीय मठकर स्मृती पुरस्कार ज्या व्यक्तींना दिले ते पाहता त्यांच्या पंगतीत बसण्या एवढा मी नक्कीच मोठा नाही. असे मला वाटते.  जयानंद मठकर आणि  प्राध्यापक मधु दंडवते  त्यांचे कार्य मी जवळून पाहिले आहे. त्यांच्या प्रचारासाठी अनेक खेड्यापाड्यात  त्यांच्या सोबत फिरलो आहे. अगदी रात्रीच्या वेळी एका खेड्यात एका कार्यकर्त्याच्या अंगणात बसून दंडवते त्यांच्यासोबत आम्ही भोजन केले आहे. त्यामुळे माझ्यावर  जनसंघाचे  संस्कार आहेत. तर स्वर्गीय जयानंद मठकर यांचा स्मृती पुरस्कार हा खऱ्या अर्थाने योग्य माणसाला दिला गेल्याची भावना कमलताई परुळेकर यांनी यावेळी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, आम्ही अनेक आंदोलने केली. अनेक शिष्टमंडळे मुंबईला नेली.  मात्र अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसाठी  जे आंदोलन मुंबई येथे केले, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घडविण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थाने त्यावेळीचे मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांनी मदत केली व प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांची भेट करून दिली. लोकशाही वाचवायची असेल तर खऱ्या अर्थाने मठकर यांचे विचार अंगीकारणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. असे यावेळी परुळेकर म्हणाल्या. दरम्यान, गेली 32 वर्ष आरपीडी हायस्कूलमध्ये इंग्लिश विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक व साहित्य प्रवीण बांदेकर हे मार्च महिन्यामध्ये निवृत्ती झाले. त्यांचा यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पावसकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.सुमेधा नाईक यांनी केले.