कै. गवस प्रतिष्ठानच्यावतीने मान्यवरांना पुरस्कार वितरण

मांगेली तळेवाडी इथल्या श्री महागणपती देवस्थानच्या आठव्या वर्धापनदिनाचे औचित्य
Edited by: संदीप देसाई
Published on: April 15, 2023 17:20 PM
views 84  views

दोडामार्ग : मांगेली तळेवाडी येथे श्री महागणपती देवस्थानच्या आठव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत कै. पांडुरंग गोविंद गवस प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करून करण्यात आला.

यात आनंद सगुण गवस (युवा उद्योजक) उसप बोकारवाडी, अपर्णा शंकर नाईक (आदर्श रणरागिणी) विर्डी, महेश महादेव गवस (आदर्श संचालक) मांगेली, राजेश महादेव गवस (आदर्श शिक्षक) म्हापसा गोवा, गुणाजी रामजी वाघमारे (आदर्श कृषी सहाय्यक) दोडामार्ग, नारायण गवस (उद्योजक) खोक्रल, पुंडलिक गवस (आंतरराष्ट्रीय लिमका पुरस्कार) मांगेली, रत्नदीप फटी गवस (आदर्श पत्रकारिता पुरस्कार) पिकुळे, मंगेश रामा गावडे (आदर्श युवा रनमाले लोककलाकार), महादेव तुकाराम सुतार (आदर्श संगीत कला पुरस्कार) सा.भे. वैभव विश्वनाथ केंकरे (आदर्श सामाजिक रत्न पुरस्कार) सावंतवाडी, अविनाश भोरगो गवस (आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार) मांगेली, होमदेव शामराव निनावे (कुशल संघटक) वेंगुर्ला, संदेश नारायण रेडकर (आदर्श खेळाडू पुरस्कार) उसप, अर्जुन लक्ष्मण गवस (रनमाले स्त्री कलाकार) मांगेली या सर्व जणांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी, सरपंच सेवा संघटना जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, मांगेली सरपंच सुनंदा नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, ठाकरे गट शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, ॲड. सोनू गवस आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठान सचिव दिलीप गवस, प्रास्ताविक व आभार अध्यक्ष विजय गवस यांनी मानले.