बाजारपेठ नवरात्र उत्सव मंडळाकडून कबड्डी स्पर्धेचं आयोजन

Edited by: विनायक गांवस
Published on: August 12, 2024 12:48 PM
views 188  views

सावंतवाडी : बाजारपेठ नवरात्र उत्सव मंडळ तर्फे सावंतवाडीत 15 रोजी भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात पहिलं पारितोषिक 10,000 व आकर्षक चषक तर द्वितीय पारितोषिक 5000 व आकर्षक चषक तर वैयक्तिक बक्षीस उत्कृष्ट लढाई उत्कृष्ट पकड, अष्टपैलू खेळाडू असे विविध बक्षिसांची खैरात ठेवण्यात आली आहे. यात कबड्डी संघाने मोठ्या उत्साहात सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाचे  शैलेश गंवडळकर, नंदकिशोर गावकर, आनंद अहिरे यांनी केल आहे. तसेच अधिक माहितीसाठी इनाम माडतिस 9423819376 नरेश डोंगरे 9420262001, वाशिम शेख 9423301703,/9604036383 यांना संपर्क करण्याच आवाहन केले आहे.