कणकवलीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

कर्नाटक विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 13, 2023 17:31 PM
views 164  views

*कणकवली:*   कर्नाटक मध्ये भाजपाला मोठ्या पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेस कर्नाटकमध्ये स्पष्टपणे बहुमत मिळून सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली तालुका काँग्रेसच्यावतीने तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत पटवर्धन चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसच्या कर्नाटकमधील विजयाचा आनंदोत्सव कणकवली साजरा करण्यात आला. याप्रसंगी तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह युवासेनेचे राजू राठोड, प्रदीपकुमार जाधव, महेश तेली, अजय मोर्ये, राजू वरने, निलेश मालडकर, निसार शेख, आदी उपस्थित होते.