जल्लोष अमृतमहोत्सवाचा ! आरपीडीच्या स्नेहसंमेलनास शुभारंभ !

विद्यार्थ्यांनी स्वतःची स्पर्धा स्वतःशी करावी : व्ही.बी.नाईक
Edited by: विनायक गांवस
Published on: January 04, 2023 16:41 PM
views 264  views

सावंतवाडी : राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे 'अमृतोत्सव' वार्षिक सेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्यास मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. याप्रसंगी आदर्श शिक्षक, आदर्श विद्यार्थी पुरस्कार तसेच विशेष सत्कार म्हणून साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांचा सत्कार करण्यात आला. बुधवार ४ व ५ जानेवारी असे दोन दिवस विविध गुणदर्शनपर कार्यक्रम या स्नेहसंमेलनात होणार आहेत.


सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते या स्नेहसंमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते रंगावली प्रदर्शन व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आल‌. स्वागतगीत,  दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजनानं कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्राचार्य जगदीश धोंड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच अध्यक्षस्थान शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांनी भुषविले होते.


याप्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तर सहा. शिक्षिका सुखदा म्हापणकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कारान गौरविण्यात आले. आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रल्हाद जामनेकर यांना प्रदान करण्यात आला. तर डॉ. दिनेश नागवेकर पुरस्कृत प्राचार्य ज.बा. शिरोडकर आदर्श विद्यार्थी पुरस्कार माध्यमिक विभागात वेद गावडे, रूची बांदेकर, पारस दळवी, अनुष्का पवार तर उच्च माध्यमिक विभागातील संजीव मसुरकर,सायली भैरे, मयुरी गावडे, समिक्षा सावंत,केशर निर्गुण, मयुरेश नाईक यांना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तर सहशालेय उपक्रमातील गुणवंत विद्यार्थी अस्मी मांजरेकरसह उत्कृष्ट कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी मनोगत व्यक्त करताना मुख्याधिकारी जयंत जावडेकर म्हणाले, मुलांमध्ये सहभागी होता येईल असे प्रसंग अधिकाऱ्यांच्या आयुष्यात कमी येतात. हा क्षण मला अनुभवता आला हे माझं भाग्य समजतो. कलाविष्कारांच्या प्रदर्शनाच उद्घाटन करत असताना मी कोण आहे ? हा मुळ उद्देश संस्था व शिक्षक वृंदांच्या प्रयत्नांमुळे सफल झाला आहे. मुलांना स्वतःतील मी ओळखता येत असून सुप्त कलागुणांना वाव मिळत आहे. यासाठी संस्था व शिक्षकांच कराव तेवढं कौतुक थोड आहे. शिक्षण ही अशी गुरूकिल्ली आहे जी देशासमोरील आव्हान पेलू शकते. आपण विद्यार्थी हे देशाच भविष्य आहात. ज्यांना बक्षीस मिळालं त्यांच अभिनंदन आहेच व ज्यांना नाही मिळालं त्यांनी प्रयत्न सुरू ठेवावेत. आपण देशाचे उज्वल भवितव्य असून विकसित व उज्वल भारतासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूयात असं मत त्यांनी व्यक्त केल. प्रा. प्रवीण बांदेकर यांनी सत्काराला उत्तर देताना ऋण व्यक्त केले. 


संस्था सचिव, माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कोरोनामुळे गेली दोन वर्षे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. आज हा सोहळा होत आहे याचा आनंद आहे. आरपीडीच स्नेहसंमेलन हे परिसरातील लोकांसाठी खास आकर्षण असतं. विविध गुणदर्शनपर कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव दिला जातो. हेच विविध स्पर्धांत सहभागी होत शाळेचं नाव उज्वल करतात‌. आमचे विद्यार्थी व शिक्षकांच नातं हे पालकत्वाच आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या शिक्षकांच्या योगदानामुळेच आज विविध क्षेत्रात कार्यरत असणारे विद्यार्थी यश संपादन करू शकले. दरम्यान, आज गुणवंतांचा गौरव झाला‌ परंतु, अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांत सहभाग घेतला होता. त्यात यश, अपयश पदरी आल.‌ पण, विद्यार्थ्यांनी स्वतःची स्पर्धा स्वतःशी करावी, जो स्वतःची स्पर्धा स्वतःशी करतो त्याला या जगात जिंकणारा दुसरा कुणीही नसतो असा मोलाच मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.


याप्रसंगी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व्ही.बी. नाईक, खजिनदार सी.एल.नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, अमोल सावंत, च.मु. सावंत, वसुधा मुळीक, संदीप राणे, सतिश बागवे, छाया सावंत, सुधाकर सुकी, सोनाली सावंत, के.टी.परब, बाळासाहेब पाटील,  बाळासाहेब नंदीहळ्ळी, नारायण देवरकर, स्मिता ठाकूर, प्राचार्य जगदीश धोंड, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, उपमुख्याध्यापक शेखर नाईक, पर्यवेक्षक अरविंद साळगांवकर, सतीश घोटगे, तुषार वेंगुर्लेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख पूनम कदम, प्रा. रणजीत माने, विद्यार्थी प्रतिनिधी अविष्कार डिचोलकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी दीपाली राऊळ, सांस्कृतिक मंत्री क्रांती मडगावकर, मुख्यमंत्री सत्यम पेडणेकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी वैष्णवी धुमक, सांस्कृतिक मंत्री सार्थक वाटवे आदींसह प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच प्रास्ताविक प्राचार्य जगदीश धोंड यांनी केलं. तर सुत्रसंचालन प्रा. मिलींद कासार, आभार डॉ. सुमेधा नाईक यांनी मानले.


दरम्यान, दोन दिवस विविध गुणधर्शनपर कार्यक्रम, फनी गेम्स व विविध स्पर्धा, शेलापागोटे कार्यक्रम या स्नेहसंमेलनात संपन्न होणार आहेत. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी साकारलेल रंगावली , हस्तकला, चित्रकला प्रदर्शन खास आकर्षण ठरत आहेत.