
वैभववाडी : कणकवली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना उमेद्वारी गुरुवारी रात्री जाहीर झाली.यानंतर वैभववाडी,उंबर्डे येथे आज कार्यकर्त्यानी फटाक्याची आतषबाजी करीत जल्लोष केला.यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कणकवली विधानसभा हा मतदारसंघ ठाकरे शिवसेनेकडे आहे.या मतदारसंघातुन निवडणुक लढविण्यासाठी शिवसेनेकडुन सतिश सावंत,संदेश पारकर,अतुल रावराणे,सुशांत नाईक हे इच्छुक होते.मातोश्रीवरील बैठकीनतंर श्री.सावंत यांनी स्वत निवडणुकीतुन माघार घेतली.त्यानतंर देखील या मतदारसंघात तिघेजण इच्छुक असल्यामुळे उमेद्वारांच्या नाव जाहीर केले जात नव्हते.अखेर काल पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नावाची घोषणा केली.तसेच त्यांना पक्षाचा एबी फार्म देखील दिला.
या घोषणेनतंर आज वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी शहर आणि उंबर्डे येथे कार्यकर्त्यानी फटाक्यांची आतषबाजी करीत जोरदार घोषणाबाजी केली.वैभववाडी शहरात उपजिल्हाप्रमुख नंदु शिंदे,रोहीत पावसकर,बंडु सावंत,कांता धुरी,चंद्रकांत आमरसकर,बाळा पाळये,गणेश पवार,स्वप्निल रावराणे,बाबा तावडे,राजेश तावडे,तर उंबर्डे येथे जिल्हाप्रमुख रज्जब रमदूल,जावेद पाटणकर,समीर नाचरे,शाबान राऊत,सुनील कांबळे,जितेंद्र तळेकर,अहमद बोबडे,गुलझार काझी,हनिफ बोबडे,विलास पावसकर,हाजी नाचरे,मनोहर दळवी,महेश चव्हाण,सुरेश जाधव,हाजी नाचरे आदी उपस्थित होते.