जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा वाटा मोठा : दीपक केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: July 07, 2024 17:31 PM
views 239  views

सावंतवाडी : आद्यापत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक होताना मी अर्थ खात्याच्या मंत्री होतो. नुकतच राज्य सरकारने पुस्तकांच गाव म्हणून बाळशास्त्रींच पोंभुर्ले गाव घोषित केलं‌ आहे. पत्रकारांच्या सुख दुःखात आपण नेहमीच सहभागी होत असतो. जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा वाटा देखील तेवढाच मोठा आहे‌ असं प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं. येथील पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. तसेच शिक्षण विभागातील डोंगरी भागाचे निकष बदलावे अशी मागणी केली जात आहे. त्यासंदर्भात आपण आदेश दिलेले आहेत असंही मंत्री केसरकर म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी पत्रकार संघाचा १९ वा पत्रकार पुरस्कार वितरण आणि गुणवंतांचा सत्कार सोहळा रविवार येथील आर पी डी काॅलेजच्या नवरंग सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मान्यवरांना प्रदान करण्यात आले तसेच पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण व गुणवंतांचा सत्कार सोहळा रविवारी सावंतवाडीत पार पडला. 

यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा साक्षी वंजारी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, सामाजिक कार्यकर्ते अँड. नकुल पार्सेकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, जिल्हा खजिनदार संतोष सावंत, मालवणी कवी दादा मडकईकर, कॉंग्रेसचे समिर वंजारी, ज्येष्ठ पत्रकार राजेश मोंडकर, मंगल कामत, वैशाली खानोलकर,मयुर चराठकर, रामचंद्र कुडाळकर, दीपक गांवकर, विनायक गांवस, काका भिसे, नरेंद्र देशपांडे, हर्षवर्धन धारणकर, मोहन जाधव, जतिन भिसे, लुमा जाधव, विजय देसाई, नागेश पाटील, रूपेश हिराप, प्रसन्न गोंदावळे, उमेश सावंत, अनुजा कुडतरकर, रमेश बोंद्रे, प्रा. सुषमा मांजरेकर, निखिल माळकर, प्रविण परब, निलेश मोरजकर, साबाजी परब, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव,  दिलीप भालेकर, केतन आजगावकर,   पत्रकार भरत केसरकर, विकास गांवकर, विनायक वंजारे, अवधूत पोईपकर, जय भोसले, भुवन नाईक, खुशी पवार प्रसाद माधव, राष्ट्रवादीच्या सावली पाटकर, सायली दुभाषी, ऋतिक परब,  बाळासाहेब बोर्डेकर आदी अनुराधा पवार, आदी उपस्थित होते.


शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व अद्यापत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा यंदाचा वैनतेयकार मे.द.शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार सागर चव्हाण तर माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्रवीण मांजरेकर यांना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्व. हरिश्चंद्र वाडीकर आदर्श समाज सेवक पुरस्कार ग्रामीण पत्रकार निलेश परब यांना तर स्व. बाप्पा धारणकर स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार सौ दिव्या वायंगणकर यांना प्रदान करण्यात आले. डॉ अजय स्वार यांचे वडील स्व.पांडुरंग स्वार स्मृती प्रित्यर्थ जीवनगौरव पुरस्कार राजू तावडे यांना आणि कै.बंडोपंत भिसे उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार मालवण येथील छायाचित्रकार समीर म्हाडगुत यांना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यावेळी पार पडला. मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. अर्चना फाउंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आले. 

 सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात देखील पत्रकार संघ विविध उपक्रम राबवित आहेत. यासाठी पत्रकारांच कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं प्रतिपादन भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी केल. तर भविष्यात पत्रकारांच्या उपक्रमांना आमचे नेहमी सहकार्य राहील अस आश्वासन श्री.परब यांनी दिलं. मनोगत व्यक्त करताना  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे-परब म्हणाल्या, अद्यापत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा समृद्ध वारसा जपण्याच काम आमचे पत्रकार बांधव करत आहेत. महिला पत्रकारांचा असणारा सहभाग देखील कौतुकास्पद आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करण्याच काम आपण करत आहात. कोकणच्या विकासात आपलं मार्गदर्शन व योगदान आम्हा राजकारण्यांसाठी मोलाचं आहे असं मत सौ. घारे-परब यांनी व्यक्त केले. माजी आमदार राजन तेली म्हणाले, पुरस्कार प्राप्त सर्वांचे व यशस्वी मुलांचे सर्वप्रथम अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. कोकण विभागातली मुलं गेली १३ वर्ष अव्वल येत आहेत. त्यानंतरच्या स्पर्धा परीक्षांत हा आलेख दिसत नाही. त्यामुळे या मुलांच्या भविष्यातील उज्वल वाटचालीसाठी आपल्याला योग्य असा निर्णय घ्यावा लागेल अशी विनंती राजन तेली यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना केली‌. यावेळी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ साक्षी वंजारी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, सामाजिक कार्यकर्ते अँड. नकुल पार्सेकर, उबाठा शिवसेनेचे नेते चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार अँड. संतोष सावंत यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आपल्या मनोगतात म्हणाले, अद्यापत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक होताना अर्थ खात्याच्या मी मंत्री होतो. राज्य सरकारने पुस्तकांच गाव म्हणून बाळशास्त्रींच पोंभुर्ले गाव घोषित केलं‌ आहे. पत्रकारांच्या सुख दुःखात आपण नेहमीच सहभागी होत असतो. जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा वाटा देखील तेवढाच मोठा आहे‌ असं मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले. यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव सावंतवाडी तालुका सहकारी पतपेढीचे चेअरमन रमेश बोंद्रे, आर्या टेंबकर, प्रा. रुपेश पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक हरिश्चंद्र पवार सुत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी तर आभार रामचंद्र कुडाळकर यांनी व्यक्त केले.