
वेंगुर्ले: वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील पत्रकार वैभव आत्माराम गोगटे (वय ४६) यांचे आज पहाटे १:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. वैभव गोगटे यांनी विविध वृत्तपत्रातून पत्रकार म्हणून काम केले आहे. पत्रकार विवेक गोगटे यांचे ते भाऊ होत. आज दुपारी १२ वाजता त्यांच्यावर वेतोरे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.