पत्रकार निलेश जोशी यांना मातृशोक..!

Edited by:
Published on: September 29, 2023 19:16 PM
views 323  views

कुडाळ : कुडाळ अभिनवनगर येथील रहीवाशी अपर्णा अशोक जोशी 80 यांचे शुक्रवारी सायकाळी ऊपचार सुरु असताना हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.आकाशवाणी केंद्राचे सिधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी व कुडाळ पत्रकार समिती सदस्य निलेश ऊर्फ बंड्या जोशी,शंशाक व ऊमेश जोशी यांची ती आई होत. पश्चात तीन मुलगे सुना नातवंडे व अन्य असा परीवार आहे. उद्या शनिवारी कुडाळ येथील स्मशानभूमीत सकाळी दहा वाजता अंत्यविधी होणार आहे.