मतदान केंद्रावर कोकण विभागाच्या सहआयुक्तांनी दिल्या भेटी

Edited by:
Published on: November 14, 2024 19:33 PM
views 33  views

नांदगाव  : विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आज कणकवली विधानसभा मतदारसंघातील खारेपाटण, तळेरे, कासार्डे, नांदगाव तसेच कणकवली शहरातील मतदान केंद्रावर आज कोकण विभागाचे सह आयुक्त संजीव पालांडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकारी यांना सूचनाही दिल्या आहेत.

यावेळी त्यांच्या समवेत सह महसूल अधिकारी संजय पवार, नायब तहसीलदार मंगेश यादव मंडळ अधिकारी नागावकर, नांदगाव तलाठी सुदर्शन अलकुटे आदी त्या त्या ठिकाणचे पोलीस पाटील, कर्मचारी उपस्थित होते.