वेंगुर्ल्यात युवकांचा शिवसेनेत प्रवेश !

मंत्री केसरकरांच्या नेतृत्वावर विश्वास
Edited by:
Published on: August 26, 2024 05:45 AM
views 529  views

वेंगुर्ला : तालुक्यातील विविध भागातील युवकांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला. 

     वेंगुर्ला तालुका युवासेनेच्या वतीने रविवारी (२६ ऑगस्ट) येथील साई डीलक्स हॉल येथे शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे यांच्या माध्यमातून युवकांचा भव्य पक्षप्रवेश घेण्यात आला. यावेळी सावंतवाडी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष गजानन नाटेकर, सावंतवाडी खरेदी विक्री संघ उपाध्यक्ष राजेंद्र रेडकर, मळगाव उपविभागप्रमुख संदेश सोनूर्लेकर, एकनाथ हळदणकर, युवासेना वेंगुर्ले शहरप्रमुख संतोष परब, उभादांडा विभागप्रमुख नयन पेडणेकर, उपविभागप्रमुख संजय गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

    यावेळी युवा कार्यकर्ते सागर गावडे, उमेश आरोलकर, अजित कानडे, प्रज्वल पालव, विशाल राऊत, प्रथमेश पालेकर यांच्यासाहित सुमारे ५० ते ६० युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर यावेळी युवासेना तालुका सचिव म्हणून सागर गावडे, युवासेना शहर सचिव म्हणून उमेश आरोलकर, युवसेना शहर शाखाप्रमुख म्हणून प्रज्वल पालव, विशाल राऊत, सौरभ राणे, शिवराम सातार्डेकर यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. 

  यावेळी बोलताना जिल्हाप्रमूख अशोक दळवी म्हणाले की, ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला त्यावेळी काही मोजकी माणस आमच्यासोबत होती. आणि आज याचा महासागर झाला आहे. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ल्यात झालेल्या विकास कामांची पोचपावती म्ह्णून आज अनेक युवक शिवसेनेत येत आहेत. प्रवेश केलेल्या सर्व युवकांना शिवसेनेच्या संघटनेत योग्य न्याय देऊन मान-सन्मान राखला जाईल. यामुळे आता युवकांनी केंद्रशासन, राज्यशासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा शेतकरी, गरीब- गरजू  जनतेला लाभ मिळेल याचा प्रयत्न करून आपापल्या भागामध्ये पक्षवाढीसाठी काम करावं. सर्व युवकांना जास्तीत जास्त सहकार्य करण्याची भूमिका आमची राहील असे आश्वासनही अशोक दळवी यांनी दिले.

    सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असताना दीपक केसरकर यांच्यासारखे खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी आहे. विविध विकासकामे करत असताना सातत्याने जनतेच्या संपर्कात राहणारा, सर्वसामान्यांच्या सुख- दुःखाकडे पाहणारा नेता म्हणजे दीपक केसरकर आहेत. आणि हाच वारसा घेऊन आम्ही सर्व पदाधिकारी विविध माध्यमातून काम करत आहोत. आपण युवक सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहाल. भविष्यात मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असा ठाम विश्वास यावेळी बोलताना सचिन वालावलकर यांनी व्यक्त केला. 

    महाराष्ट्र राज्यात मंत्री म्हणून सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असताना मंत्री दीपक केसरकर यांना तुमच्यासारख्या युवकांनी जी आत त्यांना शक्ती दिली आहे ती फार मोठी आहे. विविध विकासकामांच्या माध्यमातून या वेंगुर्ला तालुक्यात बदल घडत आहे यासाठी शिवसेनेची सर्व मंडळी २४ तास काम करत आहेत. आणि हे करत असताना आज युवकांनी जी शिवसेना पक्षाला ताकद दिलात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे हात बळकट केलात याबद्दल सर्वांचे आभार मानतो असे यावेळी नितीन मांजरेकर यांनी सांगितले. तर आज वेंगुर्ले शहरात सतराही वोर्ड मध्ये १७ शाखेत सर्व शाखाप्रमुख मेहनतीने काम करत आहेत. आणि हे संघटनात्मक काम केल्यानंतर आज संपूर्ण शहर हे शिवसेनामय झालेलं आहे.आणि आता आपल्यासारख्या युवकांची साथ मिळाल्यानंतर आम्ही अजून जोमाने काम करू असे यावेळी शहरप्रमुख उमेश येरम यांनी सांगितले. 

   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी केले.