
सावंतवाडी : सर्वसामान्य माणूस ताणतणावाखाली जीवन जगत आहे त्यामुळे अपघात व हृदय विकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यासाठी येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान प्रत्येक माणसाची काळजी घेत आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरांमध्ये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आता एक नवीन उपक्रम सुरू करत असून जीवनरक्षक अभियान असं नाव याचे ठेवण्यात आले आहे.
जीवनरक्षक अभियानाचा उद्देश रात्री नऊ ते पहाटे सहा पर्यंत हे जीवनरक्षक अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच एखाद्या व्यक्तीस आवश्यकता भासल्यास 24 तासात ही सेवा सावंतवाडी शहरांतर्गत उपलब्ध असणार आहे. रात्रीच्या वेळी एखाद्या व्यक्तीस अस्वस्थ वाटू लागल किंवा कुठेही अपघात झाल्यास व्यक्तीला ॲम्बुलन्सद्वारा सावंतवाडी शहरातील कुठचीही हॉस्पिटल पर्यंत नेण्यासाठी थेट सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानशी संपर्क साधावा. अवघ्या काही मिनिटातच संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचतील व पेशंटला किंवा अपघातग्रस्ताला तात्काळ सावंतवाडीतील हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडतील.
जीवनरक्षक म्हणून ही सेवा संस्थेमार्फत विनामूल्य देण्यात येणार आहे, असे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे यांनी सांगितले. या जीवनरक्षक उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे उपाध्यक्ष प्रा.शैलेश नाईक,संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, सचिव समीरा खलील,रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम, हेलन निबरे, शेखर सुभेदार, शरदिनी बागवे, अशोक पेडणेकर व शामसुंदर हळदणकर सहकार्य करणार आहेत. यासाठी खाली दिलेल्या महत्वपूर्ण नंबर वर संपर्क साधू शकता.
रवी जाधव - 9405264027
रूपा मुद्राळे - 9422633971
लक्ष्मण कदम 9423304674
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








