
वैभववाडी:तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकित तिरवडे तर्फ खारेपटणच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जितेंद्र तळेकर हे नशीबवान ठरले. सरपंच पदाच्या निवडणुकीत त्यांना व त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला समसमान मते पडली होती. अखेर ईश्वरीचिठ्ठीच्या सहाय्याने तळेकर यांची निवड झाली.
या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी तिरंगी लढत झाली होती.भाजपचे योगेश पाथरे, शिवसेनेचे जितेंद्र तळेकर,अपक्ष रामदास घुगरे या तिघात लढत झाली. या लढतीत पहिल्या दोन उमेदवारांना १६५ अशी समसमान मते मिळाली.त्यामुळे लहान मुलाच्या सहाय्याने चिठ्ठी उचलण्यात आली. यत तळेकर हे सरपंच ठरले. नशीबाने श्री. तळेकर यांना साथ दिली.विद्यमान सरपंच पाथरे यांचा पराभव झाला. चिठ्ठीत लकी तळेकर लकी ठरल्यनंतर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.या विजयानंतर तळेकर ही भाऊक झाले. आपल्याला मिळालेला विजय गावकऱ्यांचा आहे.त्यांच्या सेवेसाठी पुढील पाच वर्षे काम करणार असल्याचे देखील सांगितले.