राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी जयगणेश गावकर..!

उपाध्यक्षपदी विवेक गवस
Edited by: विनायक गावस
Published on: August 02, 2023 19:13 PM
views 103  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी युवक काँग्रेस सावंतवाडीच्या तालुकाध्यक्षपदी जयगणेश गावकर तर तालुका उपाध्यक्षपदी विवेक गवस यांची नियुक्ती करण्यात आली. कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या उपस्थितीत हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

शरद पवार यांनी नेहमी युवकांच्या हाती देशाचे भवितव्य असल्याचे अत्यंत अभिमानाने सांगितले आहे. याच युवक पदाधिकाऱ्यांकडून समाजाला तत्पर असणारी संघटना सावंतवाडी तालुक्यात देखील उभी करणे हे या निवडीतून अपेक्षित असून आपल्या निवडीतून हे नक्की साध्य होणार याच सदिच्छा अर्चना घारे-परब यांनी या निवडीच्या निमित्ताने दिल्या. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. रेवती राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.