
सावंतवाडी : जाणीव जागर यात्रेच्या निमित्ताने अर्चना घारे या प्रत्येक गावात गेल्या. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यामुळे मला वाटतं उद्याचा आमदार हा जो तुमच्या गावातील व तुमचे प्रश्न ऐकेल असा असला पाहिजे. ताज हॉटेलच या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे ही स्टोरी मी दीपक केसरकर यांच्याकडून गेली पंधरा वर्षे ऐकतोय. मात्र अजून काम सुरू झालेलं नाही. पर्यटनाच्या दृष्टीने प्रगती नाही.
लोकांना आता तुतारी वाजवण्याची मोठी इच्छा झाली आहे. म्हणून तुतारी वाजवणारा माणुस हे आमच्या पक्षाचे चिन्ह आहे. लोकसभेत पैशांचा पाऊस पडला तो आतासुद्धा पडणार आहे. हे हरामाचे पैसे आहेत. स्वाभिमानी कोकणातील जनता उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या मागे ठाम पणे उभी आहे. आम्हाला बहुजनांच सरकार आणायचे आहे त्यामुळे तुमचा आशीर्वाद द्या असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केले.