
बांदा : बांद्यात प्रभाग क्रमांक २ चे उमेदवार जावेद खतिब यांनी दणदणीत विजय मिळवत शिवसेनेचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर यांचा पराभव केला.
जावेद खतिब यांनी बांद्यातील आपलं वजन कायम राखलं आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपचे विद्यमान सदस्य जावेद खतीब यांनी ४९७ मत घेत विजय प्राप्त केला.
त्यांच्यासह भाजपच्या श्रेया केसरकर यांचा विजय झाला. जावेद खतिब यांनी याठिकाणी शिवसेनेचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर यांचा पराभव केला.
जावेद खतिब यांच्या करिष्म्यापुढे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या प्रभागात भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार प्रियांका नाईक यांना ४६८ मते तर अर्चना पांगम यांना ३६६ मते मिळाली. जावेद खतिब यांच्या विक्रमी विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.