
सावंतवाडी : पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आणि जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार सावंतवाडी तालुक्यातील जावेद अबुबक्कर शहा यांची अल्पसंख्याक सेलच्या सावंतवाडी तालुकाप्रमुख पदी, मुबारक नेसरगी उप तालुकाप्रमुख, शहबाज काजरेकर उप शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी हे नियुक्ती पत्र दे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच स्वागत केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अब्दुल मज्जिद अब्बास बटवाले, शब्बीर मणीयार, आबा सावंत, रश्मी माळवदे, उप विभाग प्रमुख तात्या निकम, आबू मेस्त्री, समीरा खलील, सबीहा राईन, मुमताज कोंडी आदी उपस्थित होते.