आजगावच्या श्री देव वेतोबाचा उद्या जत्रोत्सव

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 25, 2022 20:02 PM
views 305  views

सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथील श्री देव वेतोबा भूमिका जत्रोत्सव शनिवार २६ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रम, नवसफेड, केळी ठेवणे, भूमिका देवीची ओटी भरणे, रात्री १०.३० वाजता पुराणकथा वाचन, सवाद्य आरती, मिरवणूक व त्यानंतर वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे प्रमुख मानकरी वासुदेव दिगंबर प्रभूआजगावकर यांनी केले आहे.