
मालवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधांची कोणतीही कमी पडता नये. आंगणे कुटुंबीय मंडळ यांच्या मागणीनुसार प्रशासनाने नियोजन पूर्ण करणे आवश्यक आहे. ही जत्रा आपली आहे. याच भावनेतून प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी काम करावे. कामात कोणत्याही त्रुटी राहणार नाही. प्रत्येक काम दर्जेदार व वेळेत पूर्ण झाले पाहिजे. अश्या पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे सर्व विभागांच्या अधिकारी वर्गाला दिले यावेळी आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे तसेच अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली,अतुल काळसेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारीही उपस्थित होते.