जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सकल मराठा समाज इन्सुलीचा पाठींबा

Edited by: विनायक गावस
Published on: October 31, 2023 18:28 PM
views 83  views

सावंतवाडी : मराठा समाज आरक्षणासाठी आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सकल मराठा समाज इन्सुली च्या वतीने गुरुवार दि.२ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता इन्सुली ते सावंतवाडी असा  लॉंग मार्च काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. 

सावंतवाडी चे तहसीलदार श्रीधर पाटील, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांना इन्सुली सकल मराठा समाजाच्या वतीने आज याबाबत निवेदन देण्यात आले.

तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देताना सकल मराठा समाज इन्सुली चे  अध्यक्ष नितीन राऊळ, उपाध्यक्ष विनोद गावकर, अशोक सावंत, अँड नीता गावडे , अँड कौस्तुभ गावडे, रघुवीर देऊलकर, सौ जागृती गावडे, न्हानू कानसे ,देव गावडे, रघुनाथ परब, संकेत चौकेकर, गजेंद्र कोठावळे, आप्पा सावंत, अनिल सावंत, हेमंत देसाई, मयूर चराठकर ,गंगाधर कोठावळे, मनोहर गावकर, बाळा बागवे , तुषार कोठावळे आदीं उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला इन्सुली सकल मराठा समाजाचा पाठिंबा आहे तसेच हा पाठिंबा दर्शवण्यासाठी सकल मराठा समाज इन्सुली च्या वतीने गुरुवार दि.२ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता इन्सुली ते सावंतवाडी तहसीलदार कार्यालय असा लॉंग मार्च काढण्यात येणार असून तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.

 यावेळी  मोती तलाव, माजगाव नाला मार्गे पागावाडी, आरटीओ नाका ते कोंडवाडा इन्सुली असा लॉंग मोर्चा समारोप होणार आहे. सदर लॉंग मार्च साठी मराठा समाजाच्या बांधवांनी आज तहसीलदार श्रीधर पाटील व पोलिसांना निवेदन दिले.