जरांगे पाटलांचं सतीश सावंत - सुशांत नाईकांनी केलं स्वागत

Edited by:
Published on: September 01, 2024 10:20 AM
views 382  views

मालवण : मराठा नेते मनोज जरांगे - पाटील आज मालवणमध्ये आले होते. सिंधुदुर्ग मराठा मंडळाच्या वतीने सतीश सावंत व सुशांत नाईक यांनी मालवण येथे भेट घेत त्यांचे स्वागत केले. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी  पाहणी केली. यावेळी सतीश सावंत, सुशांत नाईक, संजय सावंत, संतोष सावंत, राजू रावराणे, पिंटू पटेल, पवन भोगले, मिलिंद अहिर आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.