
सावंतवाडी : कवयित्री कल्पना बांदेकर लिखित प्रभा प्रकाशन प्रकाशित ''जपलला कनवटीचा'' या मालवणी काव्यसंग्रहाच प्रकाशन येत्या रविवारी होणार आहे. १८ मे रोजी सायं. ५ वा. श्रीराम वाचन मंदिर सभागृहात हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख, बोली भाषा अभ्यासक डॉ. नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रकाशन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, कवी अजय कांडर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच डॉ. शरयू आसोलकर, प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, अँड. संदीप निंबाळकर, मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती असणार आहे. अभिनेत्री, लेखिका, कवयित्री कल्पना बांदेकर या गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ललित लेख, कथा आदी वाड्मय निर्मीत त्यांनी केली आहे. ७५०० शब्दांचा मालवणी शब्दकोश त्यांनी निर्माण केला आहे. रविवारी त्यांच्या पहिल्या मालवणी काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार असून या कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन कल्पना बांदेकर यांनी केल आहे.