
वेंगुर्ला : पंचशील ट्रस्टचे संस्थापक संजय बलवंत खोटलेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इयत्ता आठवी ते बारावी तील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा वेंगुर्ल्याची विद्यार्थिनी जाँयसी फिलीस फर्नाडिंस हिने प्रथम क्रमांक मिळवला तर उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून गायत्री वरगावकर, श्रुतिका जुवलेकर आणि श्रुती शेवडे यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी न्यू इग्लिश स्कूलच्या असून त्यांच्या यशाबद्दल या प्रशालेचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्थाध्यक्ष विरेंद्र आडारकर, सचिव रमेश नरसुले आणि आदी संस्था संचालक व पदाधिकारी यांनी विशेष अभिनंदन केले.
सदर निंबध स्पर्धेत जिल्ह्यातील १७८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेसाठी या विद्यालयाचे अध्यापक वैभव खानोलकर आणि अजित केरकर यांनी मार्गदर्शन केले.
या दोन्ही मार्गदर्शकासह विजेते स्पर्धेक यांचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.