
देवगड : देवगड तालुक्यातील केंद्र शाळा जामसंडे नंबर १ शाळेतील मुलांना साईबाबा सोशल क्लब सिंधुदुर्ग यांच्यावतीने मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. गरजूंना मदतीचा हात देणे व समाज उपयोगी कामे करणे हा मुख्य उद्देश भागून विविध उपक्रम राबविण्या- या साईबाबा सोशल ग्रुपचे या उपक्रमातील कौतुक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष मिंगेल मोतेस मनतेरो सभासद संतोष राणे, सुधीर साटम, सुजित बाईत उत्तम वाळके, नितीन तारकर, जा मसंडे नंबर १ या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते.