
वैभववाडी : महाराणा प्रताप शिक्षण संस्थेचे सहसचिव जयसिंग परशुराम रावराणे ( वय 69 रा. नावळे) सध्या राहणार डोंबिवली मुंबई यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. खोरकर रावराणे मंडळाचे ते 30 वर्षे सक्रिय कार्यकर्ते होते. महाराणा प्रताप शिक्षण संस्थेच्या आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या कार्यकारणी सदस्य तसेच सध्या सहसचिव पदावर कार्यरत होते.
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांचा स्वभाव शांत व मनमिळाऊ होता. दैनिक तरुण भारतचे पत्रकार महेश रावराणे यांचे ते मोठे बंधू होतं. त्यांच्या आकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय, पुतणे, मोठा परिवार आहे.










