हे राज्यकर्त्यांचे अपयश : इर्शाद शेख

Edited by: विनायक गावस
Published on: August 29, 2023 13:11 PM
views 83  views

सावंतवाडी : केंद्र व राज्यातील सरकार जिल्ह्यात उद्योगधंदे आणण्यास अपयशी ठरल्यानेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आडाळी एमआयडीसीबाबत बोलत आहेत. त्यांची केंद्र व राज्यातील उद्योग मंत्र्यांच्या कामकाजाबाबत नाराजी आहे. हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येते येत आहे असा आरोप जिल्हा काँग्रेसचे इर्शाद शेख यांनी पत्रकार परिषदेत केला.


दरम्यान आडाळी एमआयडीसी बाबत तेथील कृती समितीने लॉंग मार्च काढला होता. याला काँग्रेसने पाठिंबा देऊन सहभाग दर्शवला, तर जिल्ह्यात उषा इस्पातनंतर कुठलाही मोठा उद्योगधंदा आला नाही. हे येथील राज्यकर्त्यांचे अपयश असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. गेले दीड दोन वर्ष केंद्रात व राज्यात यांचेच उद्योग मंत्री आहेत. त्यांच्या या जिल्ह्यात या कुठलेही उद्योगधंदे आणू शकले नाहीत. याचीच खंत राजन तेली यांना असावी. त्यामुळे ते असे वक्तव्य करत असावे असा टोला देखील लगावला.


यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी, शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, बाळासाहेब नंदीहळ्ळी, बाबल्या म्हापसेकर, माया चिटणीस, सुमेधा सावंत, अमेदी मेस्त्री, सुधीर मल्हार आदी उपस्थित होते.