एकनाथ शिंदेही मातोश्रीवर माफी मागायला आल्यास आश्चर्य वाटणार नाही

शरद पवार-अजित पवार भेटीवर विनायक राऊतांचा टोला
Edited by: विनायक गावस
Published on: August 14, 2023 14:04 PM
views 271  views

सावंतवाडी : सरकारमध्ये अजित पवार त्यांच्या आमदारांसह गेल्यानं शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ झालेले आहेत. त्यामुळे भविष्यात एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर माफी मागायला आल्यास आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही, असं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केलं.

 

गद्दारांना माफी नाही. माफी मागायला आलेच तर त्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अस विधान त्यांनी केलं. गळाभेट घेण्याची सवय शिवसेनेत नाही, असा टोला देखील त्यांनी शरद पवार-अजित पवार भेटीवर हाणला.