
कुडाळ : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त 15 मार्चला सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे सायं 3 ते 5 या वेळेत वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 69 कट्टर, निष्ठावंत, जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत गेली आठ वर्ष लोकसभेत मतदार संघातील नागरीकांचे न्याय प्रश्न प्रकर्षाने मांडत आहेत. तसेच ते प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या कामाची दखल सर्वसामान्य नागरीकांकडुन घेतली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे खासदार म्हणुन त्यांची ओळख मतदार संघात निर्माण झाली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पक्ष संघटना वाढीसाठी खा. राऊत जोमाने काम करत आहेत. अशातच आपल्या वाढदिवसाच्या निमित्तान जिल्ह्यातील 69 कट्टर जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करत आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.