
सावंतवाडी : मुख्यमंत्री हे प्रशासनाचे प्रमुख असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला अधिकाऱ्यांनी उपस्थित रहायलाच लागत. कबुलायतदार प्रश्न हा महत्त्वाचा आहे. हा प्रश्न सोडवताना रविंद्र चव्हाण पालकमंत्री नव्हते. त्यामुळे त्यांना दोष देता येणार नाही. पालकमंत्री व माझ्यात विनाकारण वाद होऊ नयेत अशी माझी मनापासून इच्छा आहे असं मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. पालकमंत्री यांनी 'मार्गी लागलेल्या विषयावर मुख्यमंत्र्याची बैठक लागलीय' या केलेल्या विधानाबद्दव विचारलं असता मंत्री केसरकर बोलत होते.
दीपक केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री हे प्रशासनाचे प्रमुख असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला अधिकाऱ्यांनी उपस्थित रहायलाच लागत. सावंतवाडी मतदारसंघाची जनता दरबारात बैठक असेल तर मी सुद्धा मतदारसंघाचा आमदार आहे, राज्याचा मंत्री आहे. त्यांनी मला बोलावलं असतं तर मी देखील बैठकीला गेलो असतो. कबुलायतदार प्रश्न हा महत्त्वाचा आहे. हा प्रश्न सोडवताना रविंद्र चव्हाण पालकमंत्री नव्हते. त्यामुळे त्यांना दोष देता येणार नाही. ज्यावेळी जीआर निघाला तेव्हा तो मी काढून घेतला याची कल्पना त्यांना आहे. त्यामुळे पालकमंत्री व माझ्यात विनाकारण वाद होऊ नयेत अशी माझी मनापासून इच्छा आहे असं मत त्यांनी व्यक्त केल.
तसेच 'जनता दरबार' हा सरकारचा असतो. आमदार आणि मंत्री म्हणून मला सुद्धा बोलवायला हवं होत. परंतु, मला निमंत्रण आलं नाही. म्हणून मी रागवत नाही. चौकुळ ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट पुर्वी बैठक घेण्यास सांगितली होती. १४ हा एकच दिवस मुख्यमंत्री यांचा उपलब्ध होता. स्वातंत्र्य दिनापूर्वी बैठक लावली तर उपोषण करणार नाही असं चौकुळ ग्रामस्थांनी सांगितले होते. त्यामुळे या बैठकीत उपस्थित रहात चौकुळ ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडावी. प्रश्न सुटावा हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. वन आणि महाराष्ट्र शासन या दोन्हींच वाटत एकत्रित व्हाव या ग्रामस्थांच्या मागणीमुळे जागा वाटपाला विलंब होत आहे असं मंत्री केसरकर म्हणाले.