जेष्ठ कलावंतांनी रुजवलेली दशावतारी कला युवक जोपासतात हे कौतुकास्पद : रामसिंग राणे

रेडी येथे दशावतार नाट्य महोत्सवाचे उदघाटन
Edited by:
Published on: April 11, 2025 14:11 PM
views 137  views

वेंगुर्ले : दशावतार कला प्रेमी ग्रुप यांनी ४ वर्षांपूर्वी आमच्याकडे दशावतारी नाट्य महोत्सवाची मागणी केली. त्यानुसार प्रितेश राऊळ यांनी ही जबाबदारी स्वीकारून हा महोत्सव आयोजित केला व आज सलग ४ वर्षे यशस्वीपणे करत आहेत. रेडी गावासहित पंचक्रोशीत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात तसेच लोकांच्या वैयक्तिक अडचणी दूर करण्यात प्रितेश राऊळ व मित्रमंडळ नेहमी अग्रेसर असतात. दशावतार या कोकणच्या कलेला रेडी गावात कै बाली मास्टर, जयसिंग राणे, मंगेश दादा यांनी रुजवली व आता गावातून विविध युवक ही कला जोपासताना दिसत आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार रेडी सरपंच रामसिंग राणे यांनी रेडी येथे काढले. 

माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रितेश राऊळ मित्रमंडळ पुरस्कृत व दशावतार कला प्रेमी ग्रुप रेडी आयोजित दशावतार नाट्य महोत्सवच्या उदघाटन प्रसंगी सरपंच रामसिंग राणे बोलत होते. या दशावतार नाट्य महोत्सवाचे उदघाटन श्री देवी माऊलीला गाऱ्हाणे घालून तसेच जेष्ठ दशावतार कालावंत जयसिंग राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व जेष्ठ दशावतार कालावंत मंगेश राणे यांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. 

यावेळी जिल्हा परिषद माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, मच्छिमार नेते वसंत तांडेल, उद्योजक पराग शिरोडकर, आरवली सरपंच समीर कांबळी, दशावतार कलाकार स्वप्नील नाईक, उद्योजक प्रथमेश कामत, तंटामुक्ती अध्यक्ष बाबा राऊळ, शिवसेनेचे सुनील सादजी, माजी उपसरपंच नमिता नागोळकर, ग्रा प सदस्य रश्मी रेडकर, सागर रेडकर, आरवली माजी सरपंच तातोबा कुडव, पोलीस पाटील सीताराम राणे, कृष्णा पानजी, सामाजिक कार्यकर्ते भूषण सारंग, उत्तम कांबळी, दादा नाईक, नंदू राणे, प्रितेश राऊळ मित्रमंडळाचे अण्णा गडेकर, आबा राणे, परेश राऊळ, सागर राणे आदी उपस्थित होते. 

यावेळी जिल्ह्यात उभरते दशावतारी कलावंत रेडी गावातील स्वप्नील नाईक तसेच मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे- कुडाळ यांचे मालक यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना वसंत तांडेल म्हणाले, खासदार नारायण राणे यांनी आपल्या राजकीय जीवनात कोकणात अनेक रत्न तयार केली. त्यातली रेडी गावातील प्रितेश राऊळ व रामसिंग राणे ही दोन रत्न. यामुळे रेडी गावात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. पुढील काळात सुद्धा आपण गावची आर्थिक उन्नती करण्यासाठी ने नेहमीच अग्रेसर राहतील यात शंका नाही असेही ते म्हणाले. खासदार नारायण राणे यांना मार्गदर्शक मानून व प्रितेश राऊळ यांच्यासोबत वाटचाल करताना मी आज सरपंच पदाची यशस्वी कारकीर्द करत आहे. दादांचा कार्यकर्ता होणे हे खूप भाग्यचे असते. रेडी गावात पर्यटनाच्या माध्यमातून निधी आणताना प्रशासनावर असलेले दादांचे वजन यामुळे व नारायण राणे यांचे कार्यकर्ते म्ह्णून पूर्णत्वास लागले असेही यावेळी सरपंच रामसिंग राणे म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदशन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम राणे यांनी केले. 

गेली ४ वर्ष सातत्याने सुरू असलेल्या या दशावतार नाट्य महोत्सवाचा उत्साह दरवर्षी वाढत आहे. या मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी सर्वांचे आभार मानतो. रेडी गावात दशावतार कला मोठ्याप्रमाणात रुजली आहे. आज हा वारसा गावातील अनेक युवक जपत आहेत. रेडी गावात अनेक दशावतार कलाकार घडावे हाच या महोत्सवामागील उद्देश आहे असे यावेळी प्रितेश राऊळ यांनी सांगितले.