शिक्षकांमुळेच मी कार्यकारी अभियंता होवू शकलो : अजयकुमार सर्वगोड

'मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा'कलमठ बाजारपेठ शाळा प्रथम आल्याने केलं कौतुक
Edited by:
Published on: March 05, 2024 17:52 PM
views 101  views

कणकवली : माझ्या आई-वडिलांनी मला शिकवलं, त्या काळात असणारे माझ्या शिक्षकांनी मला घडवलं. त्यामुळेच मी कार्यकारी अभियंता पदापर्यंत पोहोचू शकलो.मी  राष्ट्रसेवा समजून काम करत आहे.कलमठ शाळेतील शिक्षकांनी मेहनत घेटल्यामुळेच कलमठ शाळा जिल्ह्यात 'मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा' अभियानात प्रथम आल्याचे कौतुक कणकवली कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी भेटीदरम्यान केले.

कलमठ बाजारपेठ शाळा क्रमांक १ या शाळेने 'मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा' या राज्य शासनाच्या अभिनव उपक्रमात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.यावेळी सरपंच संदिप मेस्त्री,माजी सरपंच महेश लाड, मुख्याध्यापक मधुरा सावंत, शिक्षक प्रमोद पवार, प्रदीप मांजरेकर, विद्या लोकरे, इंदू डगरे, सावंत मॅडम. सदस्य सुप्रिया मेस्त्री, अनुप वारंग, स्वाती नारकर, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष क्रांती मोडक, विजय चिंदरकर,नंदकुमार हजारे, बाबू नारकर, समर्थ कोरगावकर, परेश कांबळी, स्वरूप कोरगावकर उपस्थित होते.