
अग्निशमन सेवा कला व क्रीडा मंच, मुंबई आणि मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विधानाने मुंबई अग्निशमन दल विभागीय अधिकारी कै. किशोर घाडीगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ
मुंबई अग्निशमन मुख्यालय, भायखळा, येथे आयोजित केलेल्या शूटिंगबॉल स्पर्धेत
मालेगावच्या इस्तियाक संघाने प्रतिस्पर्धी मालेगावच्याच आय एस सी संघाचा सरळ दोन सेट मध्ये १५–०७, १६–१४ असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे येथील 22 संघ सहभागी झाले होते. सर्व संघांमध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा होता त्यामुळे स्पर्धा खूप रंगतदार झाली. विजयी इस्तियाक मालेगाव संघातून इस्तियाक, यासीन, मुबासिर यांनी सुंदर खेळ केला; पराभूत आयएससी मालेगाव संघातून वकार याने चांगला खेळ केला.
उपांत्य फेरीच्या दोन सामन्यात आय एससी मालेगाव संघाने आमिर काझी यांच्या संजय भोसले प्रतिष्ठान या सोलापूर संघाचा १५–०६, १५–०६ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात इस्तियाक मालेगाव संघाने सांगली जिल्हा संघाचा तीन सेट मध्ये ०६१५, १५–११, १५–०८ असा पराभव केला. या सामन्यात महेश माने व संदेश घारे यांनी अप्रतिम खेळ केला पण इष्टियाकच्या आक्रमणापुढे त्यांना हार पत्करावी लागली. स्पर्धेतील मालिकावीर म्हणून उत्कृष्ट शूटिंग केलेल्या इस्तियाक (मालेगाव संघ) याची निवड करण्यात आली, तर स्पर्धेतील बेस्ट शूटर म्हणून संदेश घारे (सांगली) याची निवड करण्यात आली.
उपउपांत्य फेरीचे निकाल :
अमीर काझी सोलापूर विजयी विरुद्ध टेंभुर्णी संघ २१–१४,
इस्तियाक मालेगाव विजयी विरुद्ध कल्याण संघ २१–१०,
आयएससी मालेगाव विजयी वि. मुंबई महानगरपालिका २१–६,
सांगली संघ विजयी विरुद्ध रायगड अलिबाग संघ २१–१६.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल, सर्व अधिकारी, अग्निशमन सेवा कला व क्रीडा मंच चे सचिव भगत, स्पर्धा प्रमुख मंगेश भोसले, स्पर्धा निरीक्षक व माजी राष्ट्रीय खेळाडू रत्नदीप रावराणे तसे अग्निशमन संघाचे राष्ट्रीय खेळाडू महेश कदम यांनी खूप परिश्रम घेतले. स्पर्धा नियंत्रक म्हणून प्रफुल्ल वाईरकर यांनी काम पाहिले.तांत्रिक सल्लागार म्हणून मिलिंद बिर्जे यांनी काम पाहिले. स्पर्धेची सर्व चषक सुरज चव्हाण यांनी पुरस्कृत केले होते.
स्पर्धेचे आयोजन मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनच्या कार्यकारिणीने पाहिले, सचिव दीपक सावंत यांनी मार्गदर्शन केले.
स्पर्धेचे उद्घाटन उपप्रमुख अग्निशमन अधिकारी भोर एस.डी सावंत; सेवानिवृत्त विभाग अधिकारी श्री. पाटील, सहाय्यक विभागीय अधिकारी सांगळे, भगत, केंद्र अधिकारी बोरुले, कै. किशोर घाडीगावकर कुटुंबिय, यांच्या उपस्थितीत झाले. नगरसेवक रोहिदास लोखंडे, समीर चव्हाण, दत्तप्रसाद पेडणेकर, अध्यक्ष, मालवण तालुका पत्रकार संघ, आंगणेवाडी येथील गजानन आंगणे यांनीही स्पर्धेला उपस्थिती दिली.
बक्षीस समारंभ उपप्रमुख अग्निशमन अधिकारी श्री.घोष व श्री भोर, सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. सांगळे व श्री.भगत, वरिष्ठ केंद्र अधिकारी विशाल चंद्रकांत विश्वासराव, केंद्र अधिकारी जितेश गोरुले, श्री सुरज चव्हाणयांच्या हस्ते संपन्न झाले.
असो.चे अध्यक्ष माजी आमदार शाम सावंत यांनी उपस्थित राहून खेळाडूना मार्गदर्शन केले, महाराष्ट्र राज्य सचिव निखिल शेडगे, मा. राष्ट्रीय पदाधिकारी पंडितशेठ पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू माणिक उर्फ बंधू साटम (निरलॉन संघ), अभय या नामांकित संघाच्या सर्व माजी खेळाडूंनी स्पर्धेला उपस्थिती दिली.
अशाच राज्यस्तरीय स्पर्धा दरवर्षी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.











