कांदुळी प्रशालेचा ISO मानांकन प्रदान | विशाल परब यांची उपस्थिती

शैक्षणिक क्रांतीच्या वाटचालीस दिल्या शुभेच्छा
Edited by: भरत केसरकर
Published on: May 01, 2023 17:12 PM
views 254  views

कुडाळ : आज 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदुळी या प्रशालेचा ISO मानांकन प्रदान सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व प्रथितयश युवा उद्योजक विशाल परब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

 कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ISO मानांकन मिळाल्याबद्दल सर्व शिक्षक, पालक, अधिकारी वर्ग व कांदुळी ग्रामस्थ यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच या शैक्षणिक क्रांतीच्या वाटचालीस शुभेच्छा हि दिल्या.