इस्कॉनच्या वतीने भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन

Edited by: विनायक गांवस
Published on: November 15, 2025 17:56 PM
views 20  views

सावंतवाडी : भगवद्गीता हे भारतीय संस्कृती आहे. ती शालेय व विद्यालयीन विद्यार्थ्यांत पर्यंत पोहोचवावी या हेतूने आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन सावंतवाडी यांच्या तर्फे भव्य भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे .या परीक्षेची नाव नोंदणी करण्याची तारीख 22 डिसेंबरपर्यंत असणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना भगवद्गीता जशी आहे तशी त्याचबरोबर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ ही एक शुद्ध आध्यात्मिक शैक्षणिक तसेच सांस्कृतिक संस्था आहे .ही संस्था स्वामी प्रभुपाद यांनी 1966 साली अमेरिका येथे स्थापन केली. या संस्थेत त्या निमित्ताने संपूर्ण जगामध्ये श्रीमद्भागवत श्रीमद्भगवद्गीता यांच्या आधारे प्रचार करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे . त्याचबरोबर बालक व तरुण यांच्यापर्यंत भारताचा आध्यात्मिक वारसा प्राचीन संस्कृती व नीतिमूल्य,वाचन संस्कृती पोहोचविण्याचे कार्य ही संस्था करत आहे. या कार्यासाठी इस्कॉनमध्ये अनेक स्तरातून आलेले उच्च पदवीधर कुशाग्र बुद्धी मान प्राप्त असे स्वयंसेवक सेवाभावी वृत्तीने कार्य करीत आहे. दरवर्षी इस्कॉन बालकांसाठी व तरुणांसाठी सांस्कृतिक मूल्य पोहोचविण्यासाठी विविध चर्चासत्रे स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन करत असते. विश्वास आहे की भारताची परंपरा व संस्कृती द्वारे भारत हा जगातील एक महासत्ता बनू शकेल.

महात्मा गांधी, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, अल्बर्ट आईन्स्टाईन, न्यूटन, डॉक्टर राधाकृष्णन इत्यादी थोर महापुरुषांनी भगवद्गीतेला आपले मार्गदर्शक मानले असून त्यांचा आदर्श घेऊन आम्ही भगवद् गीतेवर आधारित प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केलेले आहे. या भगवद् गीतेवर आधारित प्रज्ञाशोध परीक्षेचा अभ्यास शिक्षक पालकांना व समाजात आदर देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. समाजातील अनेक तरुण व्यसनं करतात त्यामुळे एकाग्रता अभाव यासारख्या घटना वाढत आहेत.

विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनवणे मानवी नितीन मूल्ये आत्मसात करणे. स्वयंशिस्त पाळणे व विश्व बंधुत्वाची भावना प्रेरित करणे भगवद्गीतेला जीवनात आत्मसात करण्यासाठी प्रेरित करणे, यासह अन्य गुण विकसित करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन मंदिरातर्फे करण्यात आले आहे.या स्पर्धेत पहिल्या तीन विद्यार्थ्यांना बक्षिसे अनुक्रमे 5000/-, 2000/- ,1000 रुपये देण्यात येणार आहेत. ही बक्षिसे इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या दोन गटासाठी  देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक विद्यालयातून तीन विशेष उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.यासाठी शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या परीक्षेचे नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख दिनांक 22 डिसेंबर 2024 असणार आहे. ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घरी बसून भगवद्गीतेमध्ये पाहून लिहावयाची आहे. या परीक्षेत वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एसएमएसद्वारेही नाव नोंदणी करू शकतात त्यासाठी आपला नाव इयत्ता तसेच गावाचे नाव 9421237580 आणि  98233 95851  या क्रमांकावर संपर्क करू शकता.