'तो' ठेकेदार पाणी चोरून वापरतोय..?

भगवान गवस यांचा आरोप
Edited by:
Published on: March 12, 2025 13:57 PM
views 294  views

दोडामार्ग : मणेरी ग्रामपंचायत नळ योजनेचे पाणी जलजीवन मिशनच्या कामासाठी संबंधित ठेकेदार पाणी चोरून वापरत असल्याचा आरोप मणेरी गावचे भगवान गवस यांनी केला आहे. गावात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, हा ठेकेदार कोणाच्या आशीर्वादाने पाणी आपल्या कामासाठी वापरत आहे. अशा  ठेकेदारावर प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा पुढचे पाऊल उचलले जाईल असे युवा सेना तालुका प्रमुख भगवान गवस यांनी बोलताना सांगितले.

मणेरी येथे जलजीवन मिशन योजने अंतर्गत धनगरवाडी येथे पाण्याच्या टाकीचे काम सुरु आहे सदर कामासाठी लागणारे पाणी हे संबंधित ठेकेदार मणेरी नळयोजनेच्या पाण्याचा वापर करत आहे. अगोदरच मणेरी धनगरवाडी तळेवाडी या सारख्या सर्व वाडीत सद्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहे. आणि त्यातच हा ठेकेदार आपली मनमानी करत सदरच्या कामासाठी हे नळयोजनेचे पाणी वापरत वापरत आहे. सदर मनमानी कारभार करून नळयोजनेचे पाणी वापरणाऱ्या ठेकेदार प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी गवस यांनी केली. 

तळेवाडीत पाण्याची मोठी टंचाई

दरम्यान, तळेवाडीचे ग्रामस्त कृष्णा शेटकऱ बोलताना म्हणाले की मणेरी तळेवाडी धनगरवाडी या ठिकाणी गेले कित्तेक दिवस  पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यातच टाकीचे बांधकाम करणारा ठेकेदार सदर पिण्याची पाणी आपल्या कामासाठी वापरत आहे. सदर ग्रामपंचायतचे पाणी ठेकेदाराला वापरण्यास कोणी परवानगी दिली? असा जाब त्यांनी विचारत ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केळी आहे. व पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ दूर करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.