
सिंधुदुर्ग :अयोध्येत उद्या श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना उद्या होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब हे सुद्धा अयोध्येत दाखल झाले आहेत. विशाल परब यांना खास आमंत्रण देण्यात आले असून ते अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येतील ह्या प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा "याची देही याची डोळा" त्यांना पाहता येणार आहे. प्रभू रामचंद्रांच्या नगरीत ते दाखल झाले असून ह्या सोहळ्याचा आनंद ते थेट अयोध्येत घेणार आहेत.