जामसंडेत निमंत्रण अक्षत कलश यात्रा !

श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचंनिमित्त
Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 11, 2024 07:00 AM
views 100  views

देवगड : जामसंडे येथील सर्व राम भक्तांच्या कडून श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त निमंत्रण अक्षत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सदर यात्रा जामसंडे बाजारपेठ ते दिर्बादेवी मंदिर अशी काढण्या आली ढोल ताशाच्या गजर श्रीरामाचा गजर करत निमंत्रण अक्षता कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या अक्षत कलश यात्राच्या माध्यमातून सोहळ्याचे निमंत्रण मिरवणुकीने ग्रामदेवता श्री माता दिर्बादेवी, श्री रामेश्वर, श्री हनुमान मंदिर जामसंडे तसेच श्रीराम मंदिर भटवाडी येथे अक्षत निमंत्रण देऊन तालुक्यातील नागरिकांना निमंत्रण देण्यात येणार आहे. २२ जानेवारी रोजी नागरिकांनी घरोघरी दिवाळी साजरी करावी व हा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करावा असे आवाहन देवगड तालुक्यातील श्री रामभक्त यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या अक्षत यात्रा प्रसंगी माजी आम अजित गोगटे, रा. स्व.संघाचे महेश कानेटकर, हेमंत आईर, उमेश कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, देवगड जामसंडे नगरपंचायत भाजप नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.