LIVE UPDATES

चराठा पीएमश्री शाळेल विक्रांत सावंत यांच्याकडून इन्व्हर्टर भेट

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 16, 2026 21:19 PM
views 38  views

सावंतवाडी : चराठा येथील पी एम भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजना आहेत. मात्र, अत्यावश्यक सोयी सुविधांसाठी शासकीय योजनांची वाट न पाहता या शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही माजगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य विक्रांत सावंत यांनी दिली. चराठा येथील पी एम भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या कार्यक्रमात विक्रांत सावंत बोलत होते.

 यावेळी व्यासपीठावर सरपंच प्रचिती कुबल, उपसरपंच राजन परब. माजी सरपंच बाळू वाळके, ग्रामविकास अधिकारी श्रद्धा तेंडोलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश परब , दिगंबर पावसकर, सामाजिक कार्यकर्ते राजू कुबल, बाळ्या बोंद्रे, प्रवीण सावंत, विलास परब, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर, निलेश मेस्त्री, विष्णू परब, शमिका नाईक, शिक्षिका अदिती चव्हाण, अमिषा कुंभार धनदा शिंदे, संगीत शिक्षक विजय माधव, क्रीडा शिक्षक नागेश बांदेकर आदी उपस्थित होते

शाळेत शैक्षणिक सोयी व सुविधा उपलब्ध आहेत. आधुनिक शैक्षणिक तंत्राद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. मात्र लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टर अभावी व्यत्ययासह शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे ही गरज ओळखून जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी या शाळेला आठ दिवसात आवश्यक त्या क्षमतेचा इन्व्हर्टर बसवून देण्याची ग्वाही दिली. याबद्दल उपस्थित आणि विक्रांत सावंत यांचे आभार मानले. यावेळी माजी सरपंच बाळू वाळके यानीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर सूत्रसंचालन शिक्षिका धनदा शिंदे यांनी तर आभार शिक्षिका अमिषा कुंभार यांनी मानले.