
बांदा : आजच्या धावपळीच्या युगामध्ये आरोग्य समतोल ठेवण्यासाठी योग ही काळाची गरज आहे. योगाची जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. जिल्हा परिषद केंद्र शाळा मोरगाव नं. १ शाळेत योग दिन उत्साहाने संपन्न झाला. या वेळी योग शिक्षिका स्वाती पाटील पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर सावंत, उपशिक्षक मणिपाल राऊळ यांनी विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे सु्क्ष्म व्यायाम, विविध प्रकारची आसने करून घेण्यात आली तसेच प्राणायाम बद्दल माहिती देण्यात आली.