
कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी 500 झाडे लावून ती आपण कशी जगावता येतील याच्याकडे जास्त लक्ष देणार असल्याचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी सांगितले.
सध्या 150 झाडांची लागवड आजरा, हळवल ,फोंडाघाट येथील आवर परिसरात करण्यात आली आहेत. पर्यावरण संवर्धन हाच एक संदेश यातून आपल्याला सर्व स्तरातून पोहोचवण्याचा असल्याचे बांधकाम विभाग कडून सांगण्यात आले यावेळी उपअभियंता प्रभू मॅडम , उपअभियंता विनायक जोशी, ठेकेदार व्यंकटेश सावंत उपस्थित होते.