
सावंतवाडी : सावंतवाडी चराठा पागावाडी गावठण एस टी बस फेऱ्या उद्यापासून नियमित वेळेवर सुटतील, असे आश्वासन इन्सुली भाजप शिष्टमंडळाला सावंतवाडी आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिले. आठवडा बाजार शाळा व कॉलेजला जाणारे विद्यार्थी कामगार यांना शहराच्या ठिकाणी पोचण्यासाठी एस .टी. हाच पर्याय आहे. त्यामुळे ती वेळेत येणे महत्वाचे आहे. यासाठी इन्सुली भाजपच्या वतीने आगार व्यवस्थापक बोधे यांची भेट घेवून चर्चा करण्यात आली.
यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा भाजपा जिल्हा कार्यकारीणी सदस्य गुरुनाथ पेडणेकर, जेष्ठ भाजप कार्यकर्ते अशोक सावंत, तालुका उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, इन्सुली सरपंच गंगाराम ( तात्या ) वेंगुर्लेकर, उपसरपंच कृष्णाजी सावंत, महेश धुरी, माजी ग्रा प सदस्य नंदू नाईक, प्रविण मुळीक आदीनी भेट घेतली.